Top News

शिरोळमध्ये पत्रकार संघटनेच्या वतीने शिरोळ तहसिल कार्यालयास निवेदन



शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टस् वेलफेअर असोसिएशनचे जिल्हा उपाध्यक्ष व मुरगूडचे पत्रकार प्रकाश तिराळे यांना मारहाण झाल्याच्या घटनेचा निषेध करून शिरोळ तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने तहसील कार्यालयास निवेदन देण्यात आले. दरम्यान , पत्रकार प्रकाश तिराळे यांच्यावर भ्याड हल्ला करणाऱ्या राजेखान कादरखान जमादार यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांवरील दोषीवर कडक कारवाई करावी अशी मागणी कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टस् वेलफेअर असोसिएशन , शिरोळ तालुका श्रमिक पत्रकार संघ व शिरोळ पुरोगामी पत्रकार संघटना यांच्या वतीने करण्यात आली.

       दरम्यान , यावेळी कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्ट असोसिएशनचे डॉ दगडू माने, व्हॉईस ऑफ मिडीयाचे तालुकाध्यक्ष संतोष तारळे, शिरोळ श्रमिक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष डी. आर. पाटील , चंद्रकांत भाट , बाळासाहेब माळी, सुरेश कांबळे , विश्वास कांबळे , संतोष पाटील , राजेंद्र प्रधान आदि शिष्टमंडळाच्या वतीने नायब तहसीलदार योगेश जमदाडे यांना निवेदन देण्यात आले. निवेदन स्वीकारून त्यांनी पत्रकारांच्या मागण्यांचे निवेदन वरिष्ठाकडे त्वरित कळवू असे आश्वासन दिले.

     निवेदनात म्हटले आहे की, पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे . समाजात घडणाऱ्या वास्तवदर्शी घटना लेखणीतून निर्भीडपणे मांडण्याचे काम पत्रकार करत असतात. बातमी दिल्याच्या कारणावरून 

कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टस् असोसिएशनचे जिल्हा उपाध्यक्ष व मुरगूडचे पत्रकार प्रकाश तिराळे यांना मारहाण झाली आहे . ही घटना पत्रकारिता आणि लोहशाहीला मारक असून पत्रकारांवर दहशत निर्माण करण्याचा हा प्रकार आहे. या घटनेचा कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेल्फेअर असोसिएशन यांच्यासह अन्य पत्रकार संघटनेच्याव तीने जाहिर निषेध करण्यात येत आहे.

   पत्रकार प्रकाश तिराळे यांनी दिलेल्या बातमीत कोणाच्याही नावाचा उल्लेख नव्हता . पत्रकारिता क्षेत्रात प्रामाणिकपणे वॄत्तांकन करण्याचे काम पत्रकार प्रकाश तिराळे यांनी केले आहे. पत्रकार तिराळे यांना झालेली मारहाण म्हणजे पत्रकारिता आणि लोकशाहीवर हल्ला आहे. त्यामुळे राजेखान कादरखान जमादार व त्याला सहकार्य करणाऱ्या आसिफखान उर्फ मॉन्टी आसदखान जमादार, संदीप अशोक सणगर यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत तातडीने कडक कारवाई करावी . तसेच पत्रकार तिराळे यांच्या कुटुंबीयांना पोलीस संरक्षण मिळावे, असे निवेदनात म्हटले आहे.

थोडे नवीन जरा जुने