अण्णासाहेब कदम / शिवार न्यूज नेटवर्क :
चिकोडी तालुक्यातील सदलगा या शहरी जिल्हा पंचायत चिकोडी, प्राथमिक आरोग्य केंद्र सदलगा व मातोश्री ब्लड बँक चिकोडी यांच्या संयुक्त विद्यमाने आज सुधारणा प्राथमिक आरोग्य केंद्रात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
संपूर्ण मानवी समाजाला रक्तदानाचे महत्त्व समजावे, रक्ताचा ब्लड बँकेतील साठा वाढावा, रक्तदान करणे हे श्रेष्ठ कार्य आहे. याची सर्वांना जाणीव करून देणे. त्याचबरोबर त्या रक्ताचा रुग्णांना आपत्ती काळात योग्य वापर व्हावा या उदात्त हेतूने आज जिल्हा पंचायत चिकोडी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र सदलगा येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.
या रक्तदान शिबिरामध्ये सदलगा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्री मल्लिकार्जुन फुगत्यानहट्टी, शिवप्रभू नीलवाणी, सुहासिनी सोमापूर, पल्लवी देवमाने, महादेवी पुजारी, कम्युनिटी हेल्थ सेंटर नागराळचे सचिन चव्हाण, कम्युनिटी हेल्थ सेंटर मलिकवाडचे गुरु चव्हाण मातोश्री ब्लड बँकेचे डॉक्टर श्री पवन मलवादी, टेक्निशियन दीक्षा म्हेत्रे, राकेश दयामनावर जुन्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व आशा कार्यकर्त्या व प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी या रक्तदान शिबिरासाठी उपस्थित होते .या रक्तदान शिबिरामध्ये पहिल्या सत्रात 25 ते 30 लोकांनी रक्तदान केले असून प्रत्येक रक्तदात्याला रक्तदान केल्याचे प्रमाणपत्र वरील सन्माननीय डॉक्टरांचे हस्ते समारंभ पूर्वक वितरित करण्यात आले.
