जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :
उदगांव (ता.शिरोळ) येथील जिवंधर नेमगोंडा पाटील (वय 46) यांनी गोठ्यातील खोलीतील तुळीस सुती दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सायकांळी साडे चारच्या सुमारास उघडकीस आली. याबाबतची वर्दी तेजस्विनी जिंवधर पाटील यांनी जयसिंगपूर पोलिसांत दिली आहे. तर आत्महत्याचे नेमके कारण समजू शकले नाही. अधिक तपास जयसिंगपूर पोलिस करीत आहेत.
