जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :
कोल्हापूर जिल्हयात मतदारांना आदर्शवत वाटेल अशी मतदान प्रक्रिया राबवावी असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अमोल येडगे यांनी केले.याप्रसंगी त्यांचे स्वागत सहाय्यक निडणुक निर्णय अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी केले.
सार्वत्रिक लोकसभा निवडणूकीच्या पूर्वतयारीच्या निमित्ताने सुरु असलेल्या मतदान अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण भेटी दरम्यान बोलत होते.ते पुढे म्हणाले की राज्यात प्रत्येक क्षेत्रातील उपक्रमांत कोल्हापूर जिल्हा अग्रेसर असतो.आपण सर्वांनी आपल्या जबाबदाऱ्या ओळखून लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक प्रकिया शांततेत आणि उत्सव म्हणून पार पाडावी. मतदारांना एक चांगला अनुभव द्यावा.सर्व गोष्टीमध्ये नवनवीन उपक्रम पार पाडणारा जिल्हा म्हणून कोल्हापूर जिल्हा ओळखला जातो. मतदाराना सुध्दा मतदान योग्य पध्दतीने झाले याचा आनंद मिळावा .तसेच मतदान अधिकारी आणि कर्मचारी यांनीही आपले मतदान करण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करावी. मनामध्ये कोणतीही भीती न बाळगता नियम समजून घेवून जबाबदारी पार पाडावी अशा सूचना देण्यात आल्या.
दरम्यान सकाळच्या सत्रात हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी ही प्रशिक्षणास भेट देवून निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक माहिती दिली तसेच सर्वांनी प्रशिक्षणातील बारकावे समजून घ्यावेत आणि निवडणुक प्रक्रिया सुरुळीत पार पाडण्यासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मोहिनी चव्हाण मॅडम यांनी लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानाचे महत्त्व विशद केले शिरोळ चे तहसिलदार अनिलकुमार हेळकर, तहसिलदार रसाळ साहेब यांनीही पी.पी.टी.द्वारे मार्गदर्शन केले. अखेरच्या सत्रात मतदान यंत्र,मतदान प्रक्रिया यांचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. झालेल्या प्रशिक्षणांवर आधारीत ऑनलाईन चाचणी घेण्यात आली.

