घोसरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
घोसरवाड येथील बाबुराव सिद्धनाथ डवरी यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हा सचिव पदी निवड करण्यात आली. यापूर्वी ते राष्ट्रवादी पदवीधर कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष या पदावर काम करीत होते. ते पक्षासाठी करत असलेल्या विविध कामाची दखल घेऊन व विविध समाज उपयोगी कामाची दखल घेऊन त्यांची या पदावर निवड करण्यात आली.
या निवडीचे नियुक्तीपत्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाअध्यक्ष व्ही. बी. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाअध्यक्ष रोहित पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष श्रेणिक कोगनोळे, जिल्हा कार्याध्यक्ष संतोषदादा मेंगाणे, शिरोळ राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष नागेश कोळी, अनिल घाटगे उपस्थित होते. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
