शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
जांभळी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य इंद्रायणी नेताजी यादव यांना परिवर्तन फाउंडेशन कोल्हापूर यांच्या वतीने रणरागिनी पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले. कोल्हापूर येथे झालेल्या शानदार कार्यक्रमात हा पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
इंद्रायणी यादव ह्या जांभळी ग्रामपंचायतच्या माजी सदस्य असून सामाजिक क्षेत्राबरोबर महिलांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी त्या अग्रभागी असतात. समाजातील वंचित घटकांना न्याय देण्यासाठी त्या नेहमी पुढाकार घेतात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन परिवर्तन फाउंडेशन कोल्हापूर यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून त्यांना रणरागिणी पुरस्कार नुकताच बहाल केला आहे. त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
