अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
राज्य सरकारने दहा एचपी साठी मोफत वीज दिली आहे पण थकीत बिले माफ करुन अकरा ते वीस एचपी साठी सव्वा रुपये प्रति युनिट वीज पुरवठा करण्यासिठी संपूर्ण निपाणी व चिकोडी तालुक्यातील ग्रामपंचायतीना निवेदन देण्यात येत आहेत.याचाच एक भाग म्हणून ढोणेवाडी ग्रामपंचायतीला महालक्ष्मी यंत्रमाग असोसिएशन यांच्या वतीने मागणीची निवेदन देण्यात आले.
सध्या यंत्रमाग व्यवसाय वाढीव वीज बील व कामगारांची कमतरता यामुळे आर्थिक संकटात सापडला असून यंत्रमाग व्यवसायाला उतरती कळा लागली आहे. ढोणेवाडी येथील बहुतांश कामगारानी यंत्रमाग व्यवसायात उतरुन आपल्या कुटुंबाचा गाडा चालविला आहे. यासाठी श्री महालक्ष्मी पावरलूम असोसिएशन यांच्या वतीने ग्रामपंचायतीला लेखी निवेदनात म्हटले आहे की , नऊ महिन्याचे थकीत वीज बिले माफ करुन अकरा ते वीस एचपी साठी सव्वा रुपये प्रति युनिट वीज पुरवठा करण्याची मागणी केली आहे.
यावेळी बोलताना आण्णासाहेब नागराळे म्हणाले की राज्य सरकारने वाढीव वीज बिल माफ करुन अकरा ते वीस एचपी साठी सव्वा रुपये प्रति युनिट करण्यासाठी राज्यभर शिवलिंग टिरकी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू असुन आज निवेदन देण्यात येत आहे.सरकारने वीज बील माफ करुन यंत्रमाग व्यवसायास उर्जितस्थेत आणावे असे म्हणाले.
यावेळी भीमराव खोत,सोमनाथ परकाळे, बाळासाहेब लायकर महालिंग सूर्यवंशी, संतोष संकपळ,,राहुल घाटगे .इ.मान्यवर व यंत्रमाग धारक उपस्थित होते.
