Top News

अशोक माळी यांची बोरगाव येथील विविद्दोद्देश प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघाच्या बीडीसीसी बँक प्रतिनिधीपदी निवड.



 अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

बोरगाव विविद्दोद्देश प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघाचे बीडीसीसी बँक प्रतिनिधी म्हणून , माजी ग्रा.पं. अध्यक्ष,अशोक माळी यांची निवड करण्यात आले.

संघाचे अध्यक्ष युवा नेते उत्तम पाटील यांनी माळी यांना निवड पत्र देऊन त्यांच्या पुढील कार्यास सदिच्छा दिले. बीडीसीसी बँक चे अध्यक्ष, माजी खास.रमेश कत्ती यांच्या विशेष सहकार्याने या ठिकाणी अशोक माळी यांची बँक प्रतिनिधी म्हणून निवड झाली.संस्थापक अध्यक्ष रावसाहेब पाटील, कार्याध्यक्ष अभिनंदन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी संघमार्फत शेतकऱ्यांनी सभासदांसाठी वेळेत पत देऊन त्यांचे आर्थिक जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न या ठिकाणी केला जात आहे .कृषी संघामार्फत शासनाचे वतीने येणाऱ्या सर्व योजना तळागळापर्यंत पोहचवून सहकार बरोबर सामाजिक क्षेत्रालाही या ठिकाणी महत्त्व देण्यात आले आहे.माळी यांचे या ठिकाणी बँक प्रतिनिधी म्हणून निवड झाली असून त्यांच्या कार्याला आपल्या सदिच्छा असेल असे यावेळी उत्तम पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

निवडी नंतर अशोक माळी यांचा संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. सहकार महर्षी रावसाहेब पाटील उद्योजक अभिनंदन पाटील व सहकार रत्न उत्तम पाटील यांच्या विषयी मार्गदर्शन व सहकार्यामुळे आपली या ठिकाणी या पदावर निवड झाली असून त्यांनी ठेवलेल्या विश्वासास आपण नेहमीच पात्र राहू असे यावेळी अशोक माळी यांनी सांगितले.

 यावेळी संघाचे उपाध्यक्ष सुमित रोड्ड, संचालक राजेंद्र पाटील, प्रदीप माळी, दर्शन पाटील,प्रवीण पाटील, राजेंद्र ऐदमाळे, सुरेश बंकापुरे,तैमूर मुजावर, राजू गजरे , संघाचे सी.ईओ.आर.टी. चौगुला, सहाय्यक राकेश फिरगन्नवर ,रमेश माळी, अण्णा माळी ,अमर उमराणे आदी मान्यवर उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने