हेरवाडच्या माने कुटुंबीयांना दिला मदतीचा हात
हेरवाड येथील विनोद माने यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्यानंतर त्यांच्या पश्चात असणाऱ्या तीन मुली आई व पत्नी त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याबाबतची वृत्त शिवार न्यूज नेटवर्कने प्रसारित केल्यानंतर इचलकरंजी येथील नेहमीच सामाजिक कार्यात अग्रभागी असणाऱ्या मैत्री फाउंडेशनच्या वतीने विनोद माने यांची मुलगी सुप्रियाचा शैक्षणिक खर्च उचलला आहे. दरम्यान, एक महिने पुरेल एवढ्या राशनची मदत देण्यात आली आहे. सुप्रिया ही शरद पॉलिटेक्निक येथे प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. मैत्री फाऊंडेशनने केलेल्या या सामाजिक कार्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दि १३ जानेवारी २०२४ रोजी विनोद माने यांचे हृदयविकाराच्या झटक्याने अचानक निधन झाले. घरात असणारी वृद्ध आजी, शिक्षण घेणाऱ्या तीन मुली, पत्नी या संपूर्ण माने कुटुंबियाची जबाबदारी विनोद यांचावर होती मात्र त्यांच्या अचानक निधनाने माने कुटुंबियावर मोठे संकट कोसळले आहे. मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी, वृद्ध आजींची देखभाल आणि संसारचा गाडा ओढण्याची जबाबदारी पत्नी रुपाली यांच्यावर आली असून त्यांना आर्थिक मदतीची गरज होती. याची दखल घेऊन इचलकरंजी येथील माहिती फाउंडेशनने पुढाकार घेऊन सदरच्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च उचलला आहे. मैत्री फाउंडेशन या अगोदरही हेरवाड येथील खडके, नदाफ या कुटुंबाचे छत्र हरपल्यानंतर त्यांनाही मोठी मदत दिली होती. त्यामुळे मैत्री फाऊंडेशनचे समाजातून कौतुक होत आहे.
