नृसिंहवाडी / शिवार न्यूज नेटवर्क
श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री स्वामी समर्थ गुरुपीठात( दत्तधाम) आज जागतिक सुर्यनमस्कार दिनानिमित्त आयोजीत सुर्यनमस्कार,ओंमकार,प्राणायाम योगासने शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
आखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर,नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजीत आजच्या सुर्यनमस्कार शिबिरामध्ये तरुण- तरुणी,महिला -पुरुष सेवेकर्यानी सहभाग घेतला. आजच्या धावपळीच्या युगात माणसाकडे स्वतःच्याच आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळेनासा झाला आहे.यामुळे प्रत्येकाच्या आरोग्याच्या छोट्या- मोठ्या तक्रारी वाढलेल्या दिसुन येतात. यासाठी "आरोग्य हीच धनसंपदा"हे ब्रीदवाक्य लक्षात ठेवुन प्रत्येकानी व्यायामाला महत्व देऊन स्वतःसाठी सकाळी सकाळी अर्धा तास वेळ द्यावा व नित्य सुर्यनमस्कार,ओमकार,प्राणायाम,योगासने केल्यास आपल्याला निरोगी आरोग्य लाभते.
व्यायामामुळे चांगले आरोग्य राहतेच तसेच यामुळे उंची वाढते,दृष्टी तिक्ष्ण होते,स्मरणशक्ती वाढते,सर्वांगाला व्यायाम मिळतो.यासह अनेक फायदे होतात. यामुळे सुर्यनमस्कार एक संपुर्ण व्यायाम पध्दत आहे.याचा प्रत्येकानी अंगिकार करावा असे यावेळी सांगण्यात आले. सुर्यनमस्कार करण्याची पद्धत व प्राणायाम,योगासनेँँ कशी करावीत याची सर्वकंश माहीती यावेळी देण्यात आली.
