सुनिल दावणे / शिवार न्युज नेटवर्क :
मासेवाडी (ता .गडहिंग्लज) येथील टक्केकर कुटूंबीयांचा काही दिवसांपूर्वी दुर्दैवीरित्या गोठ्याला आग लागून ४ म्हशी जळून मरण पावल्या होत्या. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ८०% समाजकारण व २० % राजकारण या विचारधारेनुसार शिवसेना कोल्हापूर उपजिल्हाप्रमुख अनिरुद्ध केदारी रेडेकर यांनी टक्केकर कुटुंबियांना म्हैस प्रधान करून एका शेतकरी कुटुंबाला त्या प्रसंगातून सावराण्याचे व मदत करण्याचा एक चांगला उपक्रम राबवला. हा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ रावजी शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राबविण्यात आला.
याप्रसंगी सरपंच सौ रोहिणी रेडेकर, गडहिंग्लज शहरप्रमुख अशोक शिंदे , हेब्बाळ उपसरपंच सुरज गवळी विजय लाक्यनवार गडहिंग्लज तालुका संघटक, वैभव ठोंबरे- युवा सेना तालुका प्रमुख, शिवाजी बचाटे उपशहर प्रमुख , चेअरमन सौ शशिकला टक्केकर, सदस्य चाळू कांबळे , सेक्रेटरी अशोक टक्केकर गडहिंग्लजयाबद्दल सर्व क्षेत्रातून त्यांचे कौतुक होत आहे.
