शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा आनंदोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने शिरोळ येथील श्रीराम मंदिरात पूजा -अर्चा ,अभिषेक , शोभा यात्रा यासह विविध धार्मिक कार्यक्रम अमाप उत्साहात पार पडले. यावेळी श्रीराम मंदीरात उपस्थितीत राहून शेकडो भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले.
दरम्यान ,या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात प्रभू श्री रामचंद्र यांचे डिजिटल फलक लावण्यात आले होते .शिवाय ठिकठिकाणी प्रमुख मार्गावरील दुतर्फा भगवे ध्वज लावून रांगोळी काढून शहर सजवण्यात आले.
येथील छत्रपती शिवाजी चौकात अनेक वर्षापासून प्रभू श्रीरामचंद्र मंदिर आहे . श्रीराम... जय राम.... जय जय राम....असा जयघोष करीत सोमवारी वारकरी संप्रदाय मंडळी तसेच भाविकांच्या उपस्थितीत श्री राम मंदिरात श्रींची आराधना करण्यात आली. नियोजन मंडळाचे सदस्य दलितमित्र डॉ अशोकराव माने व त्यांच्या पत्नी रेखादेवी माने यांच्या हस्ते श्रींची काकड आरती व अभिषेक सोहळा झाला . त्यानंतर दुपारी १२ वाजता महिला भजनी मंडळाच्या उपस्थितीत श्री ची आरती आणि अखंड नामजप करण्यात आला .
सायंकाळी ४ वाजता येथील छत्रपती शिवाजी चौक ते बाजारपेठ मार्गे अशा प्रमुख मार्गावरून श्रींची शोभायात्रा काढण्यात आली . या शोभायात्रेत श्रींची पालखी , छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा यांच्यासह श्रीराम -लक्ष्मण - सिताई व बजरंग बली यांचा सजीव देखावा , गोंधळ गीत सादर करणारे कलाकार यांचा समावेश होता. हलगी रणवाद्य व धनगरी ढोल यासह झांजपथक वाद्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. विशेषतः तरुणांनी डोक्यावर भगवी टोपी तसेच पारंपारिक वेशभूषा व फेटे परिधान केले होते.
तसेच डोकीवर कलश घेऊन महिला मोठ्या प्रमाणात शोभायात्रेत सहभागी झाल्या होत्या. सायंकाळी साडेसात वाजता दिपोत्सव सोहळा संपन्न झाला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते महाप्रसादाचे वाटप करण्यात आले . हभ प निलोबा अनिल शिरसट ( सोलापूर ) यांचे रात्री किर्तन झाले. या सोहळ्यास मंदिराचे पुजारी अनुराग त्रिपाटी ,अभिनंदन त्रिपाठी यांच्यासह आमदार डॉ राजेंद्र पाटील - यड्रावकर , दत्त साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील , गुरुदत्त शुगर्स चे चेअरमन माधवराव घाटगे , दत्त चे संचालक अनिलराव यादव , दरगु गावडे , शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई , माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील ,युवा नेते पृथ्वीराजसिंह यादव , डॉ अरविंद माने , प्रवीण चुडमुंगे , डॉ दगडू माने,
मुकूंद गावडे, संजय शिंदे ,शिवाजीराव माने - देशमुख, पंडित काळे , चंद्रकांत भाट, डी आर पाटील , विठ्ठल भाट, बाळ ढवळे , सुधाकर शेंडगे ,दिलीपराव माने , किरण गावडे, शिवशांत हिरेमठ, रामचंद्र पाटील , धनाजी पाटील - नरदेकर, सागर कोळी, बाळासाहेब कोळी, आप्पासाहेब पुजारी, चंद्रकांत महात्मे, तात्या पाटील, नितीन चुडमुंगे , गजानन संकपाळ , अनिरुद्ध जोशी, संभाजीराजे भोसले , देवाप्पा पुजारी , दादासो कोळी , मजीद आतार आदि उपस्थितीत होते.

