Top News

अभिषेक चव्हाण या उत्साही युवकाचे अयोध्येकडे सायकलवरून प्रयान

 कर्नाटकातील सदलगा ते उत्तर प्रदेशातील अयोध्या हा १७६८ किलोमीटरचा सायकल प्रवास

अण्णासाहेब कदम / शिवार न्यूज नेटवर्क :

आज अयोध्येतील नवनिर्मित राम मंदिरातील श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या शुभ मुहूर्तावर सदलगा येथील साहशी व उत्साही तरुण युवक अभिषेक संजय चव्हाण याचे प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी अयोध्येकडे सायकलवरून प्रस्थान झाले आहे.

२१ वर्षीय तरुण युवक अभिषेक चव्हाण हा साहशी व उत्साही असून आपण आपल्या जीवनामध्ये समाजासाठी कोणता तरी आदर्श ठेवावा या उदात्त हेतूने बी कॉम ची पदवी संपादन केलेल्या व सध्या डी वाय पाटील कॉलेज कोल्हापूर येथे एम बी ए चे शिक्षण घेत असलेल्या या तरुणाने हा सायकल प्रवास आपल्या धाडसी निर्णयाने घेतला आहे.

हा सायकलीचा प्रवास मजल दर मजल करत दररोज किमान शंभर  किलोमीटर पूर्ण करण्याचा मानस आहे. त्याचा आयोध्या प्रवास मार्ग सदलगा, मिरज, तुळजापूर, लातूर, नांदेड, यवतमाळ, महागाव, वर्धा, नागपूर , जबलपूर, रेवा, प्रयाग राज, सुलतानपूर, अयोध्या असा १७६८ किलोमीटरचा प्रवास असून हा दीर्घ प्रवास फक्त १६ दिवसांत पूर्ण करून अयोध्येत पोचण्याचा त्याचा नवा प्रयत्न असणार आहे.

सदलगा येथून तो एकटाच सायकल वारीला निघाला आहे. वाटेत विश्रांतीसाठी मंदिर , धर्मशाळा, पेट्रोल पंप, सेवाभावी संस्था, बस स्थानक आदी ठिकाणी मुक्काम करणार असल्याचे त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. याच्या या प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी सदलगा शहरातील श्री संजीव पाटील श्री अतिक्रांत पाटील यांच्यासह त्यांचे अनेक तरुण युवक कार्यकर्ते सदलगा शहरातील हनुमान मंदिर या ठिकाणी उपस्थित होते. आपला प्रवास सुखकर होवो!! अशा शुभेच्छा उपस्थित जनसमुदायाने त्याला देऊन त्याला मार्गस्थ करण्यात आले.


थोडे नवीन जरा जुने