Top News

हेरवाड : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या फंडातून २ कोटी तर खासदार धैर्यशील माने यांच्या ५४ लाखांचा निधी

 अनेक विकास कामे पूर्णत्वास ; विकास कामातून हेरवाडचा कायापालट

हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

शिरोळ तालुक्याचे विद्यमान आमदार माजी मंत्री डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर तसेच हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांच्या माध्यमातून हेरवाडचा विकास साधला जात आहे. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून विविध विकास कामांसाठी सुमारे दोन कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे, यातील बरीच कामे सध्या सुरू असून अनेक कामे प्रस्तावित आहेत. याचबरोबर खासदार धैर्यशील माने यांनीही हेरवाड गावावर विशेष लक्ष देऊन हेरवाडच्या विकासासाठी सुमारे ५४ लाखांचा निधी दिला असून लवकरच विकास कामे सुरू होणार आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून हेरवाडचा विकास साधला जात आहे.

आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या फंडातून नदी रस्त्यासाठी २५ लाख, निवारा शेड, स्मशानभूमीसाठी २० लाख, काळमवाडी येथे हॉल बांधकामासाठी १० लाख, चर्मकार समाज हॉल बांधकामासाठी १५ लाख, अंगणवाडी बांधकामासाठी २२ लाख ५० हजार, सामाजिक न्याय विभाग दलित वस्तीच्या विकासासाठी २५ लाखयासह विविध विकास कामांसाठी याचबरोबर पानंद रस्त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला असून ४४ लाख रुपये पाणंद रस्त्यासाठी लवकरच मिळणार आहेत. त्यामुळे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून हेरवाड गावाला सुमारे दोन कोटी पेक्षा अधिक रुपयांचा निधी मिळाला असून गावचा कायापालट विकास कामातून होत आहे. तर खासदार धैर्यशील माने यांच्या माध्यमातून हनुमान मंदिरासाठी १० लाख, दलित वस्तीसाठी १० लाख, मातोश्री पाणंद योजनेतून २४ लाख  रुपयांची कामे मंजूर तर चर्मकार समाजासाठी प्रस्तावित १० लाखांचा निधी मिळणार असून सदरच्या कामाचे उद्घाटन लवकरच करण्यात येणार आहे.

थोडे नवीन जरा जुने