शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
गडहिंग्लज येथील ज्येष्ठ पत्रकार सुभाष धुमे यांनी लिहिलेल्या 'जागल्याचे जग' आणि 'कॉमन मॅन' या दोन पुस्तकांचे प्रकाशन श्री दत्त कारखाना कार्यस्थळावर दत्तचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील व मान्यवरांच्या हस्ते झाले.
आपल्या अवती भोवती घडणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टींकडे साहित्यिक आणि पत्रकारांनी डोळसपणे पाहून समाजाच्या हिताच्या गोष्टी लिहाव्यात. तसेच सकारात्मक विचार लोकांच्या मनावर बिंबवण्यासाठी सकस लिखाण होणे आवश्यक असल्याचे मत गणपतराव पाटील यांनी व्यक्त केले.
सुभाष धुमे यांनी पुस्तके लिहिण्यामागील उद्देश आणि विचार मांडले. इंद्रधनुष्य मासिकाचे कार्यकारी संपादक प्रा. मोहन पाटील, रंगकर्मी राजेंद्र प्रधान, नवा भारतचे संपादक सुनील इनामदार, राष्ट्र सेवा दलाचे बाबासाहेब नदाफ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. गणपतराव पाटील यांनी सुभाष धुमे यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. पत्रकार बाळासाहेब माळी यांनी आभार मानले.
यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, दत्त भांडारचे चेअरमन दामोदर सुतार, अशोक शिंदे, अंबादास नानिवडेकर, संपादक अशोकराव कोळेकर, एम. एस. माने, डी. आर. पाटील, प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. दगडू माने, बाळासाहेब कांबळे, किरण पाटील, दिलीप माने, अभिजित माने, इंद्रधनुष्यचे सहसंपादक संजय सुतार, प्राचार्य साताप्पा कांबळे, बाबूराव श्रेष्ठी, लक्ष्मण शेडगे, प्रियांका धुमे, सखी शेडगे, सिद्धी शेडगे, असलम मकानदार, ऊस पुरवठा अधिकारी अमर चौगुले, कीर्तीवर्धन मरजे आदी मान्यवर उपस्थित होते.
