Top News

हेरवाड मुस्लिम जमियत कमिटीच्या वतीने उद्या मोफत नेत्र तपासणी शिबिर

 हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

मुस्लिम जमीयत कमिटी हेरवाड व मेहता आय केअर अँड लेझर सेंटर सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या मंगळवार दिनांक २ रोजी हेरवाड येथील ग्रामपंचायत समोर असलेल्या जामा मस्जिदमध्ये मोफत नेत्र तपासणी व अल्प खर्चात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते लियाकत चांदखान व अमीर मुल्ला यांनी दिली.

या शिबिरामध्ये नेत्र तज्ञांच्या मार्फत रुग्णांची तपासणी केली जाणार आहे. नेत्र उपचार व शस्त्रक्रिया मेहता आय केअर सांगली येथे करण्यात येणार आहेत. याचबरोबर डोळ्यांचे नंबर तपासणी करून अल्प खर्चात नंबरचे चष्मे देण्यात येणार आहेत. या शिबिरामध्ये मोतीबिंदू ऑपरेशनसाठी निवड झालेल्या रुग्णांना मेहता आय केअर सांगली येथे नेण्यात येणार आहे. ऑपरेशन साठी येणारे पेशंट यांना येण्या-जाण्याची, राहण्याची व जेवणाची सुविधा मोफत करण्यात येणार असून ऑपरेशन नंतर लागणारे काळे गॉगल्स मोफत दिले जाणार आहेत. तरी या शिबिराचा लाभ हेरवाड मधील ग्रामस्थांनी घ्यावा, असे आवाहन लियाकत चांदखान व अमीर मुल्ला यांनी केले आहे सदरचे शिबिर हे सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत असणार आहे.

थोडे नवीन जरा जुने