इसाक नदाफ / शिवार न्यूज नेटवर्क :
पंचायत समिती माजी उपसभापती भवानीसिंह घोरपडे सरकार यांच्या पुढाकारातून व सुमन भट (व्हाईस प्रेसिडेंट कोटक महिंद्रा लाइफ इन्शुरन्स ) यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तवाड, टाकळीवाडी, टाकळी येथील गावांमध्ये मोफत विमा शिबिर घेऊन गावातील नागरिकांना कोटक महिंद्रा लाईफ इन्शुरन्स या कंपनीचा रुपये १० हजार चा जीवन विमा देण्यात आला.
भवानीसिंह घोरपडे सरकार हे नेहमी समाजकार्यात अग्रेसर असतात. एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची या परिसरात ओळख आहे. वयोमर्यादा १८ ते ५५ वर्षे विमाधारक व्यक्तीला रुपये १० हजार चा विमा पुढील पाच वर्षासाठी राहील. ५ वर्षे पूर्ण झाल्यावर रुपये ५२० विमाधारक व्यक्तीच्या बँक खात्यात जमा होतील. अशी या विम्याची वैशिष्ट्ये आहेत. वरील योजना ही दत्तवाड, टाकळीवाडी, टाकळी गावातील लोकांसाठी पूर्णपणे मोफत आयोजित करण्यात आली होती. याचा लाभ या परिसरातील असंख्य नागरिकांनी घेतला.
भवानीसिंह घोरपडे सरकार हे नेहमी जनकल्याणासाठी प्रयत्नशील असतात. वाचनालय, व्यायाम शाळा इ. अनेक उपक्रम त्यांनी या परिसरात राबवून युवकांना व्यसनाधीन होण्यापासून थांबवले आहे. एका लोकप्रतिनिधीला लाजवेल असे कार्य भवानीसिंह घोरपडे सरकार या परिसरात नेहमी करत असतात. त्याबद्दल त्यांचे या परिसरात कौतुक होत आहे.
