Top News

उद्योजिका वैशाली शिंदे यांना व्यावसायिक सेवा पुरस्कार जाहीर

जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :

मौजे आगर येथील एस.व्ही.सेफ्टी सर्व्हीसेसच्या सौ. वैशाली सुरेश शिंदे यांना रोटरी क्लब ऑफ ग्रीन सिटी जयसिंगपूर च्या वतीने देण्यात येणारा२०२३-२४च्या व्यावसायिक सेवा पुरस्कारासाठी निवड करण्यात आलीआहे.व्यावसायिक नितीमूल्य जोपासत ज्या व्यावसायिकांनी आपल्या व्यवसायात उल्लेखनीय प्रगती केलेली आहे.अशा व्यावसायिकांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार दिला जातो.या संबंधी निवडीचे पत्र प्रेसिडेंट रोटे. सुदर्शन कदम,सेक्रेटरी रोटे. सचिन रायनाडे,इव्हेंट चेअरमन व व्होकेशनल डायरेक्टर रोटे. बजरंग खामकर व मान्यवरांनी सुपूर्द केले.

         दि.६ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता रोटरी ग्रीन सिटी ट्रस्ट हॉल, छत्रपती शाहू इंडस्ट्रीयल इस्टेट मौजे आगर,जयसिंगपूर येथे शानदार कार्यक्रमात सदरचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

थोडे नवीन जरा जुने