Top News

देवपुष्प इंग्लिश मिडियम स्कूलच्या बालचमूंनी फोडली दहीहंडी


हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
हाथी घोडा पालखी.. जय कन्हैया लाल की...' असा जयघोष, श्रीकृष्ण-राधा यांची बालचमूंनी केलेली वेशभूषा, दहीहंडी फोडण्यासाठी थर लावण्याचा प्रयत्न करणारे बाळगोपाळ अशा उत्साहाच्या वातावरणात हेरवाड येथील देवपुष्प इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमात मुलांनी मनमुराद आनंद लुटला. ' आणि दहीहंडी फोडताच बालचमूंनी एकच जल्लोष केला. राधा कृष्णाची वेशभूषा करून शाळेतील बालचमू दहीहंडी उत्सवात सहभागी झाले होते. शाळेत बांधण्यात आलेली दहीहंडी श्रीकृष्ण रूपातील बालकांनी बासरीच्या मदतीने फोडली. यावेळी शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने