Top News

हेरवाड हायस्कूल हेरवाड येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा

 


हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

 ५ सप्टेंबर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी हेरवाड हायस्कूल हेरवाड येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण दिवस शाळा चालवली, अध्यापनाचे कार्य केले व शिक्षक होण्याचा अनुभव घेतला. सर्व शिक्षकांचा व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा भेटवस्तू देऊन सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी विद्यार्थ्यांचे मनोगत झाले. त्याचबरोबर शिक्षक झालेल्या विद्यार्थ्यांनी आपले अनुभव व मनोगत कथन केले. सूत्रसंचलन कुमार सोलापुरे याने केले. यावेळी एन. एम. एम. एस.व स्कॉलरशिप परीक्षेचे तास घेणाऱ्या सर्व शिक्षकांचाही सत्कार विद्यालयाच्या मुख्याध्यापिका माणिक नागावे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख मनिषा डांगे,दहावीचे वर्गशिक्षक बिरु देबाजे,बाळकृष्ण फल्ले व सर्व शिक्षकांनी केले.ग्रामपंचायत हेरवाड च्या सरपंच व सर्व सदस्यांनी हायस्कूल मधील सर्व शिक्षकांचा सत्कार केला व मिठाई वाटप करुन शिक्षकदिन गोड केला.आभार कुमारी पाटील हिने मानले.यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी हजर होते.

थोडे नवीन जरा जुने