शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
येथील यादव प्रेमी युवा मंचच्या वतीने तालुक्यातील सर्वात मोठ्या दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून १,११,७७७ (एक लाख अकरा हजार सातशे सत्याहत्तर) रूपयाचे बक्षीस देण्यात येणार असल्याची माहिती यादव प्रेमी ग्रुपचे अध्यक्ष अजित देशमुख व निमंत्रक प्रतीक पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
येथील यादव प्रेमी युवा मंचच्या वतीने युवा नेते पृथ्वीराजसिंह यादव यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार दि.१२ सप्टेंबर रोजी सांयकाळी ०७ वाजता “छत्रपती शिवाजी महाराज चौक" येथे या दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन आमदार सौ.श्वेताताई महाले पाटील यांच्या हस्ते ,पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक सुशील मेंगडे यांच्या अध्यक्षतेखाली व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. तसेच या दहीहंडीचे खास आकर्षण स्टार प्रवाह व झी युवा चॅनलचे प्रसिद्ध कलाकार ऋतुजा राणे,गौरी जाधव,पूजा कदम, सारिका नागवेकर यांच्या सह मान्यवर कलाकारांच्या उपस्थितीत होणार आहे, तसेच डॉल्बी व लेजर शोच्या प्रकाश झोतात हा कार्यक्रम होणार आहे तरी या दहीहंडी उत्सवास नागरिकांनी मोठ्या संखेने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री.अजित देशमुख यांनी केले आहे.
