शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
आपण विविध क्षेत्रात काम करीत असताना केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन प्रोत्साहन देण्यासाठी सत्कार केला जातो या सत्कारामुळे आपण करीत असलेल्या कार्याची जबाबदारी पुन्हा वाढत जाते याचे भान ठेवून शिरोळच्या विकासासाठी सर्वांनी प्रामाणिकपणे कार्यरत रहावे असे प्रतिपादन लायन्स क्लबचे झोन चेअरमन व युवा उद्योजक सचिन माळी यांनी केले.
शिरोळ येथील श्री गुरुदत्त इलेक्ट्रिकल्स अँड इंजीनियर्स या उद्योग समूहाचे प्रमुख व इलेक्ट्रिकल गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर युवा उद्योजक अभिजीत दिलीपराव माने आणि श्री रेणुका भक्त मंडळाचे अध्यक्ष दिलीपराव रामचंद्र माने व माने परिवाराच्या वतीने विविध निवड क्षेत्रात झालेल्या मान्यवर तसेच स्पर्धा परीक्षा व क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवलेले विद्यार्थी आणि पुरस्कार प्राप्त व्यक्ती यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी युवा उद्योजक सचिन माळी हे बोलत होते ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष बजरंग काळे या समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते स्वागत दिलीपराव माने यांनी केले प्रास्ताविक डॉ. दगडू माने यांनी केले.
गुरुदत्त शुगर्स टाकळीवाडीचे संचालक शिवाजीराव माने- देशमुख, शिवाजीराव जाधव- सागले, शिरोळ हातकणंगले तालुका सेवानिवृत्त महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष पंडित काळे, शिरोळ तालुका खादी ग्रामोद्योग सहकारी संघाच्या चेअरमन सौ प्रतिभा निनाद भोसले, संचालक सुरेश गंगधर, भारतीय जनता युवा मोर्चा कोल्हापुर जिल्हा अध्यक्ष डॉ अरविंद माने, शिरोळ तालुका भाजपा अध्यक्ष मुकुंद उर्फ बाळासाहेब गावडे, शिरोळचे स्वीकृत नगरसेवक रावसाहेब पाटील- मलिकवाडे, लायन्स क्लबचे झोन चेअरमन सचिन माळी, जयसिंगपूर बाजार समितीचे संचालक विजयसिंह माने- देशमुख, रामदास गावडे, शिवाजीराव चव्हाण, डॉक्टरेट मिळाल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार दगडू माने, राज्यस्तरीय धन्वंतरी कृतज्ञता पुरस्कार प्राप्त डॉ अतुल पाटील, आयकॉन पुरस्कार प्राप्त डॉ उमेश कळेकर, जिल्हा परिषदेचा राजश्री शाहू आदर्श पुरस्कार प्राप्त फिरोज हेतवडे, छत्रपती संभाजी महाराज युवा गौरव पुरस्कार प्राप्त सचिन सूर्यवंशी, मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडा रत्न पुरस्कार प्राप्त स्केटिंग प्रशिक्षक तेजस पाटील, लायन्स क्लब ऑफ शिरोळचे अध्यक्ष सुनील देशमुख, सेक्रेटरी भास्कर पाटील, खजिनदार अभिजीत गुरव, रोटरी क्लब ऑफ शिरोळ हेरिटेज सिटीचे अध्यक्ष संजय तुकाराम शिंदे, सेक्रेटरी तुकाराम पाटील, ट्रेझरर संजय रामचंद्र शिंदे, रोटरी क्लब ऑफ शिरोळचे अध्यक्ष आबा उर्फ बाबुराव जाधव, सेक्रेटरी अमित पंडित, ट्रेझरर डॉ अंगराज माने, केंद्रीय पोलीस दलात निवड झालेल्या गायत्री अरुण माने, थायलंड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त निवेदिता अमरसिंह शिंदे, राष्ट्रीय ज्युडो कराटे स्पर्धेत पदक प्राप्त पवित्रा सुनील माने, स्केटिंगच्या विविध प्रकारात विश्वविक्रमाची नोंद करणारे विवांश किरण पाटील- कणंगलेकर, हर्षवर्धन काकासो कोळी, सार्थक संतोष कोळी, आर. एस. पी. चे राज्य महासमादेशक अनिल कुंभार, उद्योगपती संतोष जाधव. या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
डॉ अरविंद माने, पंडित काळे, शिवाजीराव माने- देशमुख, सचिन सूर्यवंशी. यांनी सत्कार केल्याबद्दल माने परिवाराचे आभार मानून यापुढेही शिरोळ शहराच्या लौकिकात भर टाकण्याचे कार्य करण्यास कटिबद्ध आहोत दिलीपराव माने व युवा उद्योजक अभिजीत माने यांनी या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने शहरात स्नेह ऋणानुबंध आणि जिव्हाळा जोपासण्याचे काम केले असल्याचे सांगितले
समारंभाचे अध्यक्ष बजरंग काळे बोलताना म्हणाले की शिरोळच्या विकासासाठी दिलीपराव माने नेहमीच प्रयत्नशील असत युवा उद्योजक अभिजीत माने यांनी अल्पावधीत प्रगती केली असून शिरोळ शहरातील मान्यवरांचा सत्कार करून त्यांनी केलेल्या कामाची पोचपावती देण्याचा प्रयत्न या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने करण्यात आला असून सर्व मान्यवरांनी शिरोळच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील राहावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी माने परिवारातील शामराव माने , बाळासो माने , रावसाहेब माने , भाऊसो माने , लालासो माने , प्रकाश माने , राजवर्धन माने , तुषार माने , योगीराज माने अमरसिंह शिंदे आप्पासाहेब पुजारी बाळासाहेब कोळी बापूसाहेब गंगधर आयुब मेस्त्री सुजित पाटील प्रल्हाद पाटील रमेश पाटील उदय संकपाळ किरण पाटील कणंगलेकर काकासो कोळी अमर सावंत बाबुराव माने पिंटू माळी मनोज चुडमुंगे अनिल माने इस्माईल मुजावर प्रशांत सूर्यवंशी यांच्यासह मान्यवर व नागरिक उपस्थित होते शेवटी चंद्रकांत भाट यांनी आभार मानले.
