Top News

मैत्री फौंडेशन ने फ्रेंडशिप डे चे औचित्य साधुन शैक्षणिक मदत करून एक आगळा वेगळा आदर्श निर्माण केला

 


इचलकरंजी / शिवार न्यूज नेटवर्क :

इचलकरंजी शहरातील नावाजलेल्या मैत्री फौंडेशन ने फ्रेंडशिप डे साजरा केला. यावेळी विरूपाक्ष महादेव कडते यांची कन्या कु.श्रेया विरूपाक्ष कडते हिला तिच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत केली.यावेळी प्रमुख पाहुणे रामकिशोर वर्मा -उपाध्यक्ष राष्ट्रीय मारवाडी युवा मंच, जुगलकिशोर बियाणी - अध्यक्ष मारवाडी युवा मंच,

 अमित राठोड -उपाध्यक्ष मारवाडी युवा मंच,महावीर सिंघवी -कोषाध्यक्ष मारवाडी युवा मंच,राधेश्याम झंवर- सचिव महेश युवक मंडळ या मान्यवरांच्या हस्ते चेक देण्यात आला.

          पाहुण्यांचे स्वागत आणि मैत्री फौंडेशन ची माहिती फाउंडेशन चे अध्यक्ष- चंद्रप्रकाश छाजेड यांनी व सूत्र संचालन अशोक खोत यांनी केले आणि मनोगत-रामकिशोर वर्मा,संजय कांबळे,प्रफुल्ल घाटगे,अनिल कुंभार,बाळू ओझा यांनी व्यक्त केले. 

       यावेळी महिला मध्ये मैत्री महिला परिवार अध्यक्षा - वहिदा नेजकर, इंदिरा माहेश्वरी,अंजली शर्मा, सुवर्णा खराडे आणि बाळू कळुमोडे, बाळू व्हणुगरे, प्रकाश बलवान,नंदू साळुंखे,उज्ज्वल चराटे,हिंदुराव मोरे,गजानन चौधरी,अनिल अलासकार,यशवंत नाईक,महादेव पाटील,सुमंत वडर,कपिल बगाडिया इत्यादी उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने