प्रल्हाद साळुंखे / शिवार न्यूज नेटवर्क :
सैनिक टाकळी येथील कुमारी स्नेहल संभाजी पाटील हिचे आय.डी.बी.आय बँकेमध्ये सिलेक्शन झाले आहे. स्नेहलचे शिक्षण पहिले ते पाचवी ब्रेन लिपी मधून कोल्हापूर येथे झाले. पाचवी ते दहावी कोल्हापूर येथे झाले. पुढील शिक्षण कुरुंदवाड येथे झाले. लहानपणापासूनच स्नेहाला अभ्यासाची आवड होती .पाचवी ते दहावीपर्यंत परीक्षा देतेवेळी स्नेहल जवळ दुसऱ्या मुलीला बसवून तिला लिहिण्यास स्नेहल सांगत होती. अशा पद्धतीने तिने परीक्षा दिली. तिने शिक्षण मोठ्या जिद्दीने पूर्ण केले .चांगल्या पद्धतीचे मार्क्स मिळवून शाळेमध्ये टॉप मध्ये असायचे सैनिक टाकळीतील माजी सैनिक कार्याध्यक्ष संभाजी पाटील यांचीही कन्या आहे तिच्या यशाबद्दल सैनिक टाकळीतील नागरिकांनी व माझी सैनिकांनी तिचा सत्कार केला. तिच्या या यशाबद्दल तिच्या आई-वडिलांचेही सत्कार केले .पुढील वाटचालीस स्नेहलला शुभेच्छा दिल्या .जन्मताच अंध असून सुद्धा या मुलीने जगासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. त्याबद्दल पंचक्रोशीतील लोकांना त्याची कौतुक वाटत आहे.
