इचलकरंजी / शिवार न्यूज नेटवर्क :
प्रमुख पाहुणे राजाराम बोगार्डे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शाळेमधून शाळेतील शिक्षण व शिस्तीमधून चांगले नागरिक घडतील. देशाच्या विकासासाठी शिक्षण हेच प्रगती घडवणारे माध्यम ठरावे. व हे काम शिक्षकांनी करावे असा आशावाद व्यक्त केला.
संस्थेचे चेअरमन व कार्यक्रमाचे अध्यक्ष मदनराव कारंडे यांनी आपल्या आध्यक्षिय मनोगतामध्ये देशाच्या 76 व्या स्वातंत्र दिन साजरा करताना विद्यार्थ्यांनी सध्याच्या काळातील ज्वलंत प्रश्नांचा विचार करुन देशाच्या विकासाचे ध्येय बाळगून जीवन जगावे, इस्त्राईलसारख्या देशाशी तुलना करताना त्या देशांचा विकास का झाला आहे, होतो. आहे, त्यांची कामाची पध्दत, राष्ट्राप्रतीची भावना, उदंड देशाभिमान व नव-नवीन संशोधनाच्या माध्यमामधून अखंड मानवजातीच्या उपयोगाचे अनेक शोध लावून स्वतःबरोबर जगाला सावरावे. विद्यार्थ्यांनी स्वतःचा वेळ अभ्यास व नव-नवीन शोधासाठी व कार्यासाठी देऊन समाजाला व देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी घालवावा असा बहुमोल संदेश दिला.
प्रशालेमध्ये देशाच्या 76 व्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाचे ध्वजारोहण यशवंत प्रोसेसचे माजी व्हा. चेअरमन , उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते श्री. राजाराम बोंगार्डे यांच्या शुभहस्ते, होऊन कार्यक्रमास सुरवात झाली. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत व ध्वजगीत झाले. प्रशालेतील एम.सी.सी. कॅडेट व स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजाला प्रमुख पाहुणे व उपस्थित मान्यवरांना संचलनासह मानवंदना दिली.
प्रशालेच्या मुख्याध्यापिका एम.एस. रावळ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. आपल्या प्रास्ताविकामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनानिमित्त महत्वपूर्ण संदेश दिला. एका बाजूला आपण चांद्रयान मोहिम राबवत आहोत तर दुस-या बाजूल मणीपूरसारख्या घटना घडत आहेत. ही वर्तनातील दरी शिक्षणाने व सुसंस्काराने भरून काढावी. एक चांगला नागरिक घडावा, चांगला माणूस घडावा व त्यांने इतराना घडवावे. सध्याच्या काळात देशापुढील आव्हाने फार मोठी आहेत त्यानुसार आपण सर्वांनी स्वतःमध्ये बदल घडवणे गरजेचे आहे. समाजातील सर्वच घटकांनी शिक्षक, पालक विद्यार्थी आपण सर्वांनी समाज व देशाचा विचार करुन आपले कार्य प्रामाणीकपणाने व जबाबदारीने करावे, असे बहुमोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमप्रसंगी प्रशालेतील विद्यार्थिनी कु. श्रावणी पसारे, गौरी मिरगणे व अनुज्ञा पाटील यांनी अत्यंत मोजक्या पण प्रेरणादायी शब्दात आपले मनोगत व्यक्त केले.
सदर कार्यक्रमासाठी संस्थेचे संचालक दत्तात्रय म्हेत्रे, सौ. सुंदरा जोशी मॅडम, शिवाजी कारंडे, संजय झुंजकर, तसेच इत्यादी मान्यवर व पालक, माजी विद्यार्थी / विद्यार्थिनीसह सर्व हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, ऑल्पियाड विभागाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर स्टाफ व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. एस. व्ही. पाटील मॅडम यांनी केले.
