इसाक नदाफ / शिवार न्यूज नेटवर्क :
वृक्षारोपणाबरोबरच वृक्षसंवर्धन आवश्यकच असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पाटील यांनी केले.'मेरी माटी,मेरा देश' उपक्रमांतर्गत 'वसुधा वंदन'- वृक्षारोपण कार्यक्रम विद्या मंदिर बांबरवाडी,दत्तवाड ता.शिरोळ येथे संपन्न झाली.त्याप्रसंगी प्रमोद पाटील बोलत होते.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.सर्वमान्यवरांनी यावेळी पंचप्रण शपथ घेतली.पावडोबा सोसायटीचे चेअरमन पांडुरंग चव्हाण,माजी उपसरंपच दिलीप चव्हाण,विकास भूतल,पांडुरंग बापू चव्हाण,शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा कविता पाटील,मुख्याध्यापक दिलीप शिरढोणे,अंगणवाडी सेविका रेखा चव्हाण,मदतनीस भाग्यश्री कांबळे,ग्रामस्थ,विद्यार्थी उपस्थित होते.
