कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
पालिकेच्या चतुर्थ कर आकारणीला हरकती घेण्यासाठी गुरुवारी शेवटचा दिवस असल्याने हरकती घेण्यासाठी मिळकतधारकांनी पालिकेत गर्दी केली होती. त्यामुळे कार्यालयाला यात्रेचे स्वरुप आले होते.
दरम्यान येथील तबक उद्यानातील जिम्नँशिअम हाँलमध्ये शुक्रवारी दिवसभर या हरकतीवर जिल्हा नगररचनाकार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत सुनावणी होणार असल्याने या सुनावणीकडे शहरवाशियांचे लक्ष लागून राहिले आहे.
चतुर्थ कर आकारणीनुसार पालिका प्रशासनाने मिळकतधारकांना करात 20 टक्के वाढ करुन नोटासा बजा़ल्या आहेत. कराच्या रकमेत वाढ झाल्याने नागरीकांतून नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे शहर बचाव कृती समिती, ठाकरे गट शिवसेना यांनी आंदोलनाच्या माध्यमातून गेल्या दोन महिन्यांपासून करवाढीला विरोध करत आहेत. करवाढीला विरोध करण्यासाठी रीतसर हरकती घेणे बंधनकारक असल्याने गेल्या पंधरा दिवसापासून मिकतधारक हरकती घेत आहेत.
हरकती घेण्यासाठी गुरुवार (दि. 29) शेवटचा दिवस असल्याने मिळकतधारकांनी हरकती घेण्यासाठी पालिकेत गर्दी केली होती. त्यामुळे सुमारे तीन हजार हरकती दाखल झाल्या आहेत. या हरकतीवर आज सुनावणी असल्याने करवाढ कमी केली जाते की प्रशासणाचा निर्णय योग्य मानून आहे ती कर वाढ कायम ठेवली जाते याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिले आहे.
.jpg)