Top News

जयसिंगपुरच्या क्रिकेट स्पर्धेत आर्किटेक्ट इंजिनिअर्स विजेता



जयसिंगपूर / प्रतिनिधी : 

जयसिंगपूर येथील दसरा चौक क्रिडांगणावर झालेल्या अंतिम क्रिकेट सामन्यात आर्किटेक्ट अ‍ॅण्ड इंजिनिअर्स संघाने रायझिंग यंगस्टार संघावर विजय मिळवून अजिंक्यपद पटकाविले. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघांना पारितोषिक देवून गौरविण्यात आले. 

 या स्पर्धेेचे आयोजन डॉ. श्रेणिक शंभूशेटे, डॉ. शिवराज मंगसुळे, डॉ. युवराज मंगसुळे, डॉ. प्रिन्स रजपूत, डॉ. निलेश राजमाने यांनी केले होते. या स्पर्धेमध्ये राजधानी सातारा, रायझिंग यंगस्टार, कोल्हापूर, चायस, केवीजी, सुपरज चॅलेंजर्स, आर्किटेक अ‍ॅण्ड इंजिनिअर्स संघांनी सहभाग नोंदविला होता. अंतिम सामन्यात आर्किटेक अ‍ॅण्ड इंजिनिअर्स संघाने विजय मिळवून चषकाचा मानकरी ठरला. मालिकावीर म्हणून डॉ. विनायक रायकर, उत्कृष्ट गोलंदाज डॉ.शेखर पोवालकर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक डॉ. अभिषेक साळुंखे, उत्कृष्ट यष्टीरक्षक डॉ.अभिजित निकम, उत्कृष्ट फलंदाज म्हणून प्रियतोष भोसले यांचा गौरव करण्यात आला. विजेत्या संघांना माजी नगरसेवक महेश कलगुटगी यांच्याहस्ते चषक देवून सन्मानित करण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संदीप खराडे, अशोक कलगुटगी, गौतम पट्टर, मनोज चौगुले यांनी परिश्रम घेतले.

थोडे नवीन जरा जुने