हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
सध्या हेरवाड ग्रामपंचातीच्या पंचवार्षिक निवडणूकीची तारीख जाहीर झाल्यामुळे गावातील राजकीय वातावरण तापले आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी गटातील दोन खमके पॅनेल एकमेकाविरोधात शड्डू ठोकणार असून गावातील अन्य पुढारीही पॅनेलची तयारी सुरु केल्यामुळे हेरवाडची निवडणूक रंगतदार होणार आहे.
हेरवाड ग्रामपंचायतीसाठी लोकनियुक्त सरपंच व सदस्य असे एकुण 16 जणांची संख्या आहे. यावेळी सरपंच पदासाठी इतर मार्गासवर्गीय महिला हे आरक्षण पडले आहे. त्यामुळे इच्छूक उमेदवार नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. मागील पंचवार्षिक निवडणूकीमध्ये हेरवाड ग्रामविकास आघाडी, राजर्षि शाहू ग्रामविकास आघाडी, ताराराणी विकास आघाडी, बहुजन विकास आघाडी या चार पॅनेलच्या माध्यमातून चौरंगी लढत पहायला मिळाली. यामध्ये हेरवाड ग्रामविकास आघाडी आणि राजर्षि शाहू ग्रामविकास आघाडी या बलाढय पॅनेलची लढत रंगतदार झाली होती. आणि यामध्ये राजर्षि शाहू ग्रामविकास आघाडीला जनतेने कौल दिला होता. यावर्षी आघाडींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर गावात बैठकांना वेग आला आहे.
.jpg)