हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
हेरवाड गावामधील प्रभाग क्रमांक 5 मध्ये मा.सरपंच सुरगोंडा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मा.सदस्य अमोल कांबळे व संभाजी मस्के यांनी सुमारे 50 ते 60 लाख रुपयांची विकास कामे खेचून आणून या परिसराचा विकास साधला आहे. त्यामुळे या प्रभागातील नागरीकांतून समाधान व्यक्त होत आहे.
माळभागातील बौध्द समाज बांधवांसाठी समाज मंदिरासाठी माजी मंत्री व आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या फंडातून तसेच स्विय सहाय्यक संजय कुन्नुरे यांच्या माध्यमातून 15 लाखाचा निधी मिळाला, काळम्मावाडी वसाहतीकडे जाणार्या रस्त्यासाठी 7 लाखाचा निधी यासह सुमारे 35 लाखाचा निधी, रस्ते, गटारीसाठी खर्च करण्यात आलेला आहे. सामान्य कुटूंबातून निवडूण आलेले अमोल कांबळे यांनी खेचून आणलेल्या कामामुळे या प्रभागाचा विकास झाला आहे. यामध्ये संभाजी मस्के यांचाही मोठा सहभाग आहे.
नेहमीच माळभागातील आणि गायरानमध्ये राहणारी जनता विकासापासून वंचित राहते, मात्र, आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर युवा नेतृत्व म्हणून अमोल कांबळे व जुने जाणकार व्यक्तीमत्व म्हणून संभाजी मस्के यांनी आपल्या प्रभागाचा विकास साधल्यामुळे त्यांना पुन्हा संधी देण्यात यावी, अशी मागणी या प्रभागातील ग्रामस्थांतून होत आहे.
