इसाक नदाफ/ शिवार न्यूज नेटवर्क :
पुरस्कार प्रेरणा देतात व प्रेरणेने राष्ट्र मोठे होते!" या ध्येयाने प्रेरित होऊन गेली ५ वर्षे राज्य-राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत संजीवनी चॅरिटेबल (रजि.) ट्रस्ट संस्थेच्या वतीने यंदाचा ५ व्या वर्षातील नारीरत्न पुरस्कार सोहळा साजरा केला जाणार आहे. नवरात्री च्या शुभप्रसंगी रक्तदान दिनाचे औचित्य साधून १ ऑक्टोंबर २०२२ रोजी ५० महिलांसाठी हा पुरस्कार सोहळा इचलकरंजी येथे संपन्न होणार आहे.
या सोहळ्यातील पुरस्कारांची खालील वर्गवारी दहा शीर्षकांत निश्चित करण्यात आली आहे.
राज्यस्तरीय गुणवंत शिक्षिका गुरुगौरव पुरस्कार २०२२, राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापिका विद्यारत्न पुरस्कार २०२२, राज्यस्तरीय सरस्वती सन्मान पुरस्कार २०२२, राज्यस्तरीय आदर्श व्यवसायिका पुरस्कार २०२२, राज्यस्तरीय प्रतिभारत्न पुरस्कार २०२२, राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार २०२२, राज्यस्तरीय क्रीडारत्न पुरस्कार २०२२, राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार २०२२, राज्यस्तरीय साहित्य भूषण पुरस्कार २०२२, राज्यस्तरीय आदर्श मार्गदर्शिका पुरस्कार [कला,क्रिडा,सांस्कृतिक (नृत्य)इ. वर्ष २०१७ मध्ये कोल्हापूरमध्ये स्थापन झालेली संजीवनी चॅरिटेबल (रजि.) ट्रस्ट ही उपक्रमशील संस्था गेल्या ५ वर्षाच्या अथक परिश्रमाच्या वाटचालीतून महाराष्ट्र राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशपातळीवर विविध क्षेत्रातील हजारो गुणिजनांची एक आवडती प्रेरणादायी संस्था झाली आहे. महाराष्ट्र राज्याच्या सर्व जिल्हे आणि तालुक्यापर्यंत पुरस्कारातून प्रेरणेचे ऊर्जस्वल कार्य करणाऱ्या या संस्थेला आता राष्ट्रीय/ आंतरराष्ट्रीय पातळीवरील गुणवंत आपली हक्काची प्रेरक संस्था म्हणून ओळखू लागले आहेत. संस्थेच्या वतीने डॉक्टर, खेळाडू, महिला इत्यादी विविध वर्गासाठी झालेल्या विविध संमेलने आणि परिषदांनी महाराष्ट्र राज्यातील मुंबई /ठाण्यासह विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण या सर्व विभागात प्रचंड मोठा गुणवंत समुदाय संस्थेशी जोडला गेला आहे.
नामांकन पाठवू इच्छिणाऱ्या आवेदकांनी खाली दिलेल्या लिंकचा उपयोग करून नामांकन प्रस्ताव सादर करावा किंवा पीडीएफ स्वरूपातील बायोडाटा / कार्यपरिचय व्हाट्सअप क्रमांक 9028871199 यावर २९ सप्टेंबर पुर्वी पाठवावा. अधिक माहितीसाठी सदर नंबरवर संपर्क करावा असे आवाहन संजीवनी चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने डॅा. भूषण काळे यांनी केले आहे.
