जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :
शिरोळ तालुक्यातील प्रलंबित रखडलेल्या व नव्याने मंजूर झालेल्या ग्रामीण पाणीपुरवठा योजना आता झपाट्याने पूर्ण होतील मागील आठवड्यात तालुक्यातील 24 गावांसाठी जवळपास 48 कोटी रुपयांचा निधी जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर होऊन त्यांना प्रशासकीय मान्यता मिळाली होती या गावांमधील पाणीपुरवठा योजनेच्या कामांच्या निविदा प्रक्रिया आता प्रसिद्ध होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत आहे याचाच भाग म्हणून शिरोळ तालुक्यातील जांभळी गावच्या पाणीपुरवठा योजनेसाठी २ कोटी ०६ लाख ५८ हजार ८०७ रुपये तर शिरढोण गावच्या पाणीपुरवठा योजनेसाठी १ कोटी ९७ लाख ०९ हजार ५०० रुपये इतक्या अंदाजपत्रकीय खर्चास शासनाने प्रशासकीय मान्यता दिली असून या वरील दोन्ही गावां मधील कामाची निविदा प्रक्रिया लवकरच प्रसिद्ध होऊन पाणी पुरवठा योजनांच्या कामाला सुरुवात होणार आहे अशी माहिती माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली आहे, पाणीपुरवठा मंत्री नामदार गुलाबराव पाटील यांनी या कामी सातत्याने केलेल्या सहकार्याबद्दल आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत, त्याचबरोबर तालुका व जिल्हा पाणीपुरवठा अधिकारी यांचे या कामी सहकार्य लाभल्याचे सांगितले आहे.
.jpg)