इचलकरंजी / शिवार न्यूज नेटवर्क
लायन्स क्लबतर्फे जवाहर नगर येथील शंकरराव जाधव प्राथमिक विद्यामंदिर येथे हेल्दी स्कूल उपक्रमा अंतर्गत प्रत्येक वर्गामध्ये फॅन फिटिंग व ट्यूब लाईट फीटिंग करून देण्यात आले. सामान्य कामगार वस्तीतील शाळेची गरज ओळखून लायन्स क्लबने फॅन व ट्यूब लाईट फिटिंग करून देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली याबद्दल शिक्षक व पालक वर्गातून लायन्स क्लब चे कौतुक होत आहे. सदर या सेवा कार्यासाठी लायन सचिन येलाजा व लायन वर्षा येलाजा यांचे बहुमोल सहकार्य लाभले.
याप्रसंगी लायन्स क्लबचे अध्यक्ष महेंद्र बालर यांची प्रमुख उपस्थिती होती. सचिव सुभाष तोष्णीवाल, खजिनदार संदीप सुतार, स्कूल कमिटी चेअरमन नंदकुमार बांगड, ला. अमित पोद्दार, ला.कृष्णा भराडीया , लेडीज कॉर्डिनेटर ला.कांता बालर, ला. रेणू बांगड आदी उपस्थित होते.
