दत्तवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
दत्तवाड येथे भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या अपूर्वा अण्णाप्पा शिरढोणे या मुलीच्या उपचारासाठी अॅड सुशांत संजय पाटील यांनी आर्थिक मदत करून पुढे उपचारासाठी मयूर उद्योग समूह तर्फे सहकार्य करू असे आश्वासन दिले.
सदर मुलीच्या तब्बेतीची विचारपूस करून जखमी अपूर्वा आणि वडील श्री अनिल शिरढोणे यांचेकडून माहिती घेतली. यावेळी उपस्तिथ नातेवाईक यांना धीर दिला. तसेच माननीय तहसीलदार शिरोळ व दतवाड सरपंच यांना भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सूचनाही केल्या.
