Top News

हर घर तिरंगा उपक्रमाची इचलकरंजी लायन्स क्लबच्या वतीने जनजागृती

 


इचलकरंजी / शिवार न्यूज नेटवर्क :

भारतीय स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून "आझादी का अमृत महोत्सव, हर घर तिरंगा" या उपक्रमांतर्गत आज शहापूर पोलीस ठाणे इचलकरंजी व लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी यांचे संयुक्त विद्यमाने इचलकरंजी शहरातील जनतेच्या मनात राष्ट्र अभिमान जागृत व्हावा तसेच राष्ट्रीय वीरांना अभिवादन करण्यासाठी सदर उपक्रमाची माहिती इचलकरंजी शहरातील जनतेला व्हावी व त्यामुळे शहरातील नागरीकांनी आपल्या घरावर 13 ते 15 ऑगस्ट पर्यंत तिरंगा ध्वज लावावा.याकरिता सदर उपक्रमाच्या माहितीचा डिजिटल फलक ऑटोरिक्षावर लावण्यात आले.

             याप्रसंगी शहापूर चौक व डेक्कन ऑटोरिक्षा मित्र मंडळ इचलकरंजी येथील ऑटोरिक्षावर शहापूर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षिका मा.हिना शेख मॅडम,लायन्स क्लब चे श्री.अध्यक्ष ला.महेंद्र बालर यांचे हस्ते डिजिटल फलक लावणेत आले.

              यावेळी सामाजिक कार्यकर्ते गजानन शिरगांवे, अनिल बमन्नावर,लायन्सचे सचिव ला सुभाष तोष्णीवाल,खजिनदार ला संदीप सुतार,ला.सचिन येलाज, ला.कृष्णा भराडीया,ला.किशोर पाटील,ला.अरुण पाटील,ला. नंदकुमार बांगड,ऑटोरिक्षा संघटनेचे अध्यक्ष संदीप उगळे (शहापूर),सॅम सत्तारमेकर (डेक्कन),भारत फडतारे, राजाराम माळगे,हरी पाटील,संतोष बाबर,रघुनाथ कांबळे,संजय वडगांवे,तुकाराम यादव महाराज,प्रताप मस्के,अनिल देवकारे,कुंदन कांबळे,शांताराम देसाई,संदीप कांबळे,मेहबूब मुजावर,बाळासाहेब राठोड, समीर सोलापुरे,तसेच ऑटोरिक्षा चालक/मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने