कुरूंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
येथील कुडेखान बडेनालसाहेब,बडेनाल साहेब,अठरा मशिदीसह दोन मंदिरात आज पीर पंजांची प्रतिष्ठापना करण्यात आली.दरम्यान धनगर समाज बांधवांनी बिरदेव मंदिरात तर बागडी समाजबांधवानी पंत बाळेकुंद्री महाराज मंदिरात पिर,पंजाचीप्रतिष्ठापना केली आहे.
येथील हजरत दौलतशाह वली दर्गाह येथे मंगळवारी सायंकाळी पिर पंजाच्या प्रतिष्ठापनेसाठी शहरातील कुडेखान बडेनालसाहेब,दर्गाह जवळील बडेनालसाहेब सह आदी पिराची नाल,छत्री विधी पार पडला.शहरातील झारी पीर,बारगिर पीर,गोदड पीर,भैरववाडी पीर,ढाल पीर,म्हतापे पीर,मुजावर पीर,गैबी पीर,बैरागदार पीर,बागवान पीर,मोमीन पीर,कुडेखान पीर,कारखाना पीर,ढेपणपूर पीर,खाटीक पीर,बट्टे पीर,एकता पीर,शेळके पीर,फकिरवाडा मौलाअली पीर सह आदी पिराची आज बुधवारी प्रतिष्ठापना झाली.
परंपरागत धनगर समाज बांधवांनी भैरववाडीतील बिरदेव मंदिरात पीराची प्रतिष्ठापना केली आहे. तर बागडी समाजबांधवांनी बाळेकुंद्री पंत महाराज मंदिरात गैबीपीर पंजांची प्रतिष्ठापना केली आहे.शुक्रवारी सातव्या दिवशी 9 पिरांच्या भेटी होणार आहेत.शनिवारी आठव्या दिवशी 9 पिरांच्या भेटी होणार असून भेटीसाठी यावर्षीपासून सायंकाळी 7 वाजता पीर भेटीसाठी निघणार आहेत.रविवारी खत्तलदिना निमित्त सर्व मशिदीत सायंकाळी 6 वाजल्यापासून पान-सुपारीचा तर अग्निकुंड-खाई उधळणे कार्यक्रम रात्री उशिरा पार पडणार आहे.तर सोमवारी सकाळी 7 वाजल्यापासून दहावी भेटीचा व घरोघरी दर्शनाचा कार्यक्रम संपन्न होऊन रात्री उशिरा विसर्जन होणार आहे.
शहारातील मशिदीत रमजान पकाली, बापूसाहेब आसंगे, अल्ताफ पैलवान, फारूख जमादार,जहागीर जमादार,अकील गोलंदाज, शब्बीर भिलवडे, शकील गरगरे,प्रवीण खबाले, बाबासाहेब जुगळे,सह हिंदू मुस्लीम समाज बांधवांनी पिराची बांधणी करून प्रतिष्ठापना केली .
चौकट:-येथील पिरांच्या भेटीचा कार्यक्रम रात्री 10 वाजल्यापासून सुरू होऊन उशिरा 3 वाजेपर्यंत चालत असतो. मात्र यावर्षी पिरकमिटीने सायंकाळी 7 वाजता भेटीच्या कार्यक्रमाला सुरवात करण्याचा ठराव केल्याचे शकील गरगरे यांनी सांगितले.
