इचलकरंजी / शिवार न्यूज नेटवर्क :
जुलै या डॉक्टर डे निमित्त लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी वतीने कोविड काळात कोविड योद्धा म्हणून उत्कृष्ट सेवा दिलेल्या डॉ. राजेश पवार, डॉ. अशोक बाफना, डॉ. माधव वझे, डॉ. शोएब मोमीन यांचा विशेष गौरव करण्यात आला तसेच डॉ.विलासभाई शहा, डॉ.किरण नेजे , डॉ. कुलकर्णी यांचा प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
याचबरोबर सी. ए. डे निमित्त शहरातील नामांकित सी. ए. नितीन लढ्ढा, सी. ए. अमित राठी, सी. ए. पायल मोहता, सी. ए. आयुषी बालर यांचा ही प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.व राष्ट्रीय टपाल कर्मचारी दिन निमित्ताने पोस्ट मास्तर दीपक कोळी व सर्व पोस्टमन व इतर कर्मचारी यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी लायन्स क्लब ऑफ इचलकरंजीचे अध्यक्ष लायन महेंद्र बालर, सेक्रेटरी लायन सुभाष तोष्णीवाल, खजिनदार लायन संदीप सुतार, लायन कृष्णा भराडीया, लायन महेश सारडा, लायन नंदू बांगड, लायन अमित पोतदार, लायन अशोक गडेकर, लायन सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
