Top News

माझी वसुंधरा अभियानात कुरुंदवाड नगरपालिका जिल्हयात चौथी

 


कुरुंदवाड / शिवार वार्ता न्यूज नेटवर्क

       माझी वसुंधरा या राज्य सरकारच्या अभियानात शहरातील विविध संस्था,स्वयंसेवी संस्था,पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते,सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह नागरिकांनी ही योजना प्रभावीपणे राबविल्याने कोल्हापूर जिल्ह्यात कुरुंदवाड पालिकेचा 4था क्रमांक आल्याची माहिती आरोग्य अधिकारी प्रदीप बोरगे यांनी दिली.

       महाराष्ट्र राज्य सरकारने घेतलेल्या ''माझी वसुंधरा '' या अभियानात कुरुंदवाड पालिकेचा महाराष्ट्र राज्यात 18 वा तर कोल्हापूर जिल्ह्यात 4 था क्रमांक आल्याच्या पार्श्वभूमीवर माहिती देताना अधिकारी बोरगे बोलत होते. 

      माहिती देताना अधिकारी बोरगे म्हणाले हवामानात बदल झाल्याने महापूर,अनियमित पाऊस, नैसर्गिक वादळ,कोरोनासारखी संकटे  निर्माण झाली आहेत.यावर नियंत्रण राखण्यासाठी पर्यावरणचे रक्षणा करणे हा एकमेव पर्याय असल्याने शासनाने ‘माझी वसुंधरा’ हे अभियान सुरू केले.या अभियानात शहरातील कृष्णा घाट,उद्याने, दुर्लक्षित भाग,वृक्ष,पाण्याची ठिकाणे पालिकेतील ऊर्जा वापराचे लेखापरीक्षण, पाणी वापराचे लेखापरीक्षण, कचऱ्याचे व्यवस्थापन, साधनसामग्रीचे व्यवस्थापन यसह आदी बाबींवर सामाजिक संस्था आणि नागरिकांनी केलेले श्रमदान आणि प्रशासनने घेतलेल्या कष्टामुळेच पालिकेचा आज सन्मान झाल्याचे सांगितले.

      कोरोना सारख्या आपत्तीत आपल्याला स्वच्छ जमीन, स्वच्छ हवा, शुद्ध पाणी आणि मुबलक ऊर्जा मिळवण्यासाठी पर्यावरणाच्या विविध पैलूंचे संरक्षण आणि संवर्धन करणे गरजेचे आहे.सर्वांनी सहकार्य केल्याने ‘माझी वसुंधरा’ अभियान प्रभावीपणे राबवली गेल्याने कामाची चीज झाल्याचा आनंद सफाई कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला. 

थोडे नवीन जरा जुने