शिवार न्यूज नेटवर्क :
अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील आधारीत “शेर शिवराज” हा चित्रपट रविवार (दि. २९ मे) रोजी दक्षिण कोरिया (सेऊल) मधील कोणकुक युनिर्व्हसिटी थिअटर मध्ये मराठी मंडळ कोरिया (एम एम के) यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. मागील दोन वर्षे कोविडमुळे कोणतेही कार्यक्रम करण्यास मनाई होती. पण थोडेसे नियम शिथील झाल्यामुळे मराठी मंडळाकडून प्रथमच या देशामध्ये जय भवानी, जय शिवाजी, जय शंभुराजे चा आवाज घुमला. चित्रपट पाहण्यासाठी कोरियास्थित मराठीजणांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती तसेच काही कोरियन लोक सुद्धा आले होते. हा अनुभव अप्रतिम आणि कौतुकास्पद होता, जिथे राजा शिवरायांनी अफजलखान सारख्या निर्दयी, क्रूर आणि कपटी दानवाचा कोथळा बाहेर काढल्यानंतर विजयी आनंद साजरा करण्यासाठी मराठा समाज एकटवला होता. चित्रपटातील दृश्ये अंगावरती शहारे आणण्यासारखी होती. चित्रपटानंतर अतुल खोत यांनी शिवगर्जना देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यानंतर सर्वांनी तुकसेअम पार्क मध्ये डब्बा पार्टीचा आनंद लुटला. हा कार्यक्रम यशस्वी आणि अविस्मरणीय करण्यासाठी विनायक पारळे, दिलीप पाटील, अतुल खोत, धिरज मुराळे, संतोष पाटील, अमित भट, किरण निर्मळ आणि मराठी मंडळ कोरिया चे सर्व सदस्य यांनी उत्कृष्ट नियोजन केले होते. तसेच यतीन पाटील (फाईव्ह डायमेंशन ऐंटरटेंमेन्ट) व लिजो चेरिअन यांचे चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी विशेष सहकार्य लाभले.
