Top News

हेरवाड मधील आरक्षण सोडतीत 'कही खुशी कही गम'

 


हेरवाड / शिवार वार्ता न्यूज नेटवर्क :

        हेरवाड (ता. शिरोळ) येथील  ग्रामपंचायत मध्ये आरक्षण सोडत घेण्यात आली. अध्यक्षस्थानी सरपंच सुरगोंडा पाटील होते. मंडल अधिकारी चंद्रकांत काळगे यांनी आरक्षण सोडत प्रक्रिया राबविली.

      दरम्यान सरपंचपद अनुसुचित जाती महीलांसाठी आरक्षित असल्याने व आरक्षित जागा प्रभाग एक व दोन मध्ये आरक्षण पडल्याने या प्रभागातील निवडणूक अटितटीची होण्याची शक्यता आहे. तालुक्यातील दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत हेरवाड ग्रामपंचायतीचा समावेश आहे. आक्टोंबरमध्ये ग्रामपंचायतीची मुदत संपणार असल्याने आरक्षण सोडत घेण्यात आली. त्यासाठी   ग्रामपंचायतीत सदस्य संख्या 15 आहे. दोन अनुसुचित जाती एक अनुसुचित जमाती व पाच सर्वसाधारण अशा एकूण आठ जागा महीलांसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.

   ग्रामपंचायतीत पदावर जाण्यासाठी इच्छुकांचे आरक्षणकडे डोळे लागले होते.यामुळे कही खुशी कही गम अशी परिस्थिती झाली  आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणूक रंगतदार होणार आहे. यावेळी ग्रामविकास अधिकारी पल्लवी कोळेकर, उपसरपंच विकास माळी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.


प्रभागनिहाय आरक्षण पुढील प्रमाणे -

  प्रभाग क्र. 1) अनुसुचित जाती स्त्री, सर्वसाधारण स्त्री आणि सर्वसाधारण दोन

 प्रभाग क्र. 2) अनु. जाती स्त्री, अनु. जमाती स्त्री, सर्वसाधारण

 प्रभाग क्र. 3) सर्वसाधारण स्त्री, सर्वसाधारण दोन

 प्रभाग क्र. 4) अनु. जाती, सर्वसाधारण स्त्री, सर्वसाधारण

 प्रभाग क्र. 5) सर्वसाधारण स्त्री दोन, सर्वसाधारण

थोडे नवीन जरा जुने