Top News

मेंढी पळविणे स्पर्धेत महालिंगराया कागल ग्रुपची मेंढी प्रथम

 


कुरुंदवाड / प्रतिनिधी : 

हेरवाड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मेंढी पळवणे स्पर्धेत कागल येथील महालिंगराया ग्रुपच्या मेंढीने प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यासह परिसरातील स्पर्धक सहभागी झाले होते.

येथील होळकर ग्रुपच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक वर्षी विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. या स्पर्धेत द्वितीय क्रमांक हलसिद्धनाथ शेंडूर गावच्या ग्रुपने पटकाविला, तृतीय डंग्यासिध्द आरे तर चतुर्थ क्रमांक जॉनी प्रेमी कुरुंदवाड ग्रुपने पटकाविला.

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी होळकर मंडळाचे सर्व सभासद, गावकरी व शर्यत शौकीन उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने