Top News

हेरवाडमध्ये होळकर जयंतिनिमित्त ५१ जणांचे रक्तदान

 


हेरवाड/ शिवार न्यूज नेटवर्क :

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर २९७ व्या जयंतीनिमित्त हेरवाड येथील होळकर युवा ग्रुप च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ५१ जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली. 

प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर रक्तदान शिबिराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ५१ जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली.

यावेळी महालिंग पुजारी, शंकर बरगाले, ग्रामपंचायत सदस्य सीमा बरगाले, बंडू बरगाले, आशिष अकिवाटे, सुरज कोरुचे, संतोष पुजारी, प्रथमेश पुजारी, संजय पाटील, विनोद खडके, अमुकसिद्द अकिवाटे, अभि ढोणे, गोरखनाथ पुजारी, समर्थ अकिवाटे, शुभम ईटाज, सनी पुजारी, मुतापा पुजारी यांच्यासहहोळकर ग्रुप चे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने