हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
येथील माजी सरपंच, तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष, पंचगंगा साखर कारखान्याचे माजी संचालक, पार्वती सूतगिरणीचे शासन नियुक्त माजी संचालक, जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक, शिरोळ तालुका देखरेख संघाचे माजी अध्यक्ष आणि संतुबाई दूध डेअरीचे संस्थापक अध्यक्ष सत्याप्पाण्णा धोंडीबा बरगाले (वय 81) यांचे शनिवारी हृदयविकाराच्या दुःखद निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांनी 1985 साली सरपंच पदाची धुरा सांभाळली होती तर 1990 ते 99 सालापर्यंत पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून ते कार्यरत होते . त्यांच्या निधनाने गावावर शोककळा पसरली आहे. त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी अनेकांनी रीघ लावली होती. यावेळी दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांनी अंतिम दर्शन घेऊन कुटुंबाचे सांत्वन केले. संतुबाई मंदिराजवळ त्यांच्या शेतात त्यांच्यावर दफनविधी करण्यात आला. आज रविवार सकाळी रक्षाविसर्जन आहे.