राहुल डोंगरे / शिवार न्यूज नेटवर्क :
धनगर समाजाच्या प्रगतीसाठी शिरोळ तालुक्यात सर्व धनगर समाजाच्या संघटना एकत्रित आल्या आहेत व समाजातील अनेक समस्या सोडवण्यासाठी एकत्रित लढा देण्याचा एल्गार तालुक्यातील सर्व धनगर समाज्याच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
यावेळी बोलताना यशवंत सेनेचे अमर पुजारी म्हणाले शिरोळ तालुक्यामध्ये धनगर समाज मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. पण धनगर समाज शिरोळ तालुक्यामध्ये सामाजिक राजकीय व शैक्षणिक दृष्ट्या अतिशय मागासलेला आहे.याचा फायदा अनेक नेतेमंडळीनी आजपर्यंत घेतला आहे.गावागावात धनगर समाजाच्या ग्रामपंचायत सदस्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे .पण कोणत्याही प्रमुख राजकीय पदाची जबाबदारी धनगर समाजाच्या कार्यकर्त्यास देण्यास नेतेमंडळी दुजाभाव करत आहेत.इथून पुढे धनगर समाजाचे अस्तित्व तालुक्यामध्ये दाखवण्यासाठी शिरोळ तालुक्याच्या इतिहासात प्रथमच शिरोळ तालुक्यातील सर्व विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये यशवंत सेना,मल्हार सेना,धनगर समाज महासंघ,ऑल इंडिया धनगर समाज,युवक संघटना,अहिल्या वाहिनी या संघटनेच्या व इतर समविचारी संघटनेचे सर्व पदाधिकाऱ्यांनी इथून पुढे शिरोळ तालुक्यातील सर्व समस्यावर एकत्रित येऊन काम करण्याचे ठरवले आहे.
मल्हार सेनेचे अमोल हराळे बोलताना म्हणाले शिरोळ तालुक्यात धनगर समाजाला प्रगतीपथावर नेण्याचा संकल्प केला आहे.राजकीय असो वा सामाजिक या सर्व विषयावर या सर्व संघटना एकत्र येऊन काम करणार आहेत .यामुळे शिरोळ तालुक्यातील धनगर समाजाला एक नवी दिशा व आशा मिळालेली आहे.शिरोळ तालुक्यात धनगर समाजाचा एक वेगळा दबाव गट असला पाहिजे या करिता हया सर्व संघटना पक्ष विरहित असे एकत्रित पणे काम करतील. या पुढे धनगर समाजाची व्यापक मीटिंग घेऊन पुढील ध्येय धोरणे सर्व संमतीने ठरवली जातील व नव्या सामजिक क्रांतीची दिशेने वाटचाल केली जाईल.यावेळी अभय वाळकुंजे, भिमराव पुजारी, रामा दुधाळे,दिपक ठोंबरे,अमोल मरळे,पिंटू हेरवाडे,अजय हराळे,राजू ठोंबरे,निवास कोळेकर,शिवाजी ठोंबरे,विजय ठोंबरे,बाबासो ठोंबरे,सर्जेराव शेळके तसेच इतर समाज बांधव उपस्थित होते.