Top News

संत रोहिदास हे भक्ती चळवळीचे प्रसिद्ध संत : जय कडाळे


 कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

        महाराष्ट्र ही महामानव आणि संतांची भूमी आहे. जातीपातीच्या पलीकडे जाऊन संत रोहिदास महाराजांनी सर्वसमावेशक कार्य करत शिकवण दिली आहे. ते भक्ती चळवळीचे प्रसिद्ध संत होते त्यांची प्रेरणा आणि आदर्शाचे आपण पाईक असल्याचे प्रतिपादन जय कडाळे यांनी केले.

     येथील समस्त चर्मकार समाजातर्फे संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची 645 व्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी कडाळे बोलत होते.आज बुधवारी पहाटे विठ्ठल मंदिरात पुजारी शशिकांत गायकवाड यांनी काकड आरती करून संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

   रोहिदास महाराज यांच्या पालखीचे जय कडाळे, माजी नगराध्यक्ष अक्षय आलासे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. जयंतीनिमित्त भजन,कीर्तन,पालखी मिरवणूक, महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.पालखी मिरवणुकीत हरिपंथ भजनी मंडळ व महिलांनी जलकलश,दुग्धकलश,अंबिलकलश घेऊन मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या.

 यावेळी सुनील गायकवाड, नागेश गायकवाड(पत्रकार), विजय गायकवाड,आण्णासो गायकवाड, शामराव गायकवाड,अशोक गायकवाड,सुशात गायकवाड, रवी गायकवाड,विनय गायकवाड, अविनाश गायकवाड़, गिरीश गायकवाड, अभिषेक गायकवाड, प्रथमेश गायकवाड,सचीन सातपुते,अजीत मोरे, सुनील कमलाकर,जितेंद्र ठोमके, सुरेश कमलाकर ,संजय गायकवाड, शुभांगी गायकवाड, कल्पना गायकवाड, सुलोचना गायकवाड, मीरा गायकवाड, अमृता गायकवाड , अनुराधा गायकवाड, अश्विनी गायकवाड स्नेहल गायकवाड, पूजा गायकवाड, संगीता गायकवाड, लता गायकवाड, शिल्पा गायकवाड सुनिता कमलाकर आदी समाजबांधव उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने