हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
हेरवाड (ता. शिरोळ) येथील सामाजिक कार्यकर्ते सरदार जमादार यांची ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी संघटनेच्या हेरवाड अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. सरदार जमादार हे सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असतात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. कुरुंदवाड येथे झालेल्या ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन यांच्याकडून निवड पत्र प्रदान कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. एम.जी. बागवान, तालुका अध्यक्ष मियाखान मोकाशी, जिल्हा सरचिटणीस अन्सार पटेल, दाऊद मुल्लाणी, जमीर मुल्ला, रमजान नदाफ त्याच बरोबर ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी संघटना हेरवाड अध्यक्ष पदी निवड झाल्याचे निवड पत्र सरदार जमादार यांना देण्यात आले.