Top News

जाहीरनाम्यात दिलेली सर्वच कामे मार्गी लावणार : युवानेते उत्तम पाटील यांचे प्रतिपादन

 

बोरगाव येथे नूतन नगरसेवकांचा सत्कार समारंभ



अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

        शहरवासीयांना बारा महिने मुबलक पाणी,वयोवृद्ध लोकांना वाकिंग ट्रॅक ,5 कोटी अनुदानाचे भव्य नगरपंचायत इमारत,हाय मास्क लाईट्स,हाउसिंग फॉर ऑल या योजनेअंतर्गत घरकुल प्रकल्प, कुस्ती मैदान , सर्वच समाजातील स्मशानभूमींची सुशोभीकरण, युवकांना रोजगार, शिक्षण, आरोग्य, सामाजिक ,धार्मिक क्षेत्रांना प्राधान्य देऊन प्रत्येक विभागात शुद्ध पाणी घटक निर्माण करण्याचा आपण निवडणूक मध्ये आश्वासन दिले होते. निवडणुकीत दिलेल्या अशा प्रमाणे व जाहीरनाम्यातील आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन नगर विकास पॅनलचे प्रमुख युवा नेते उत्तम पाटील यांनी व्यक्त केले.

बोरगाव अपराज गल्ली येथे नूतन सर्व नगरसेवकांचा भव्य सत्कार समारंभ नवीन करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते उत्तम पाटील तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सिकंदर आफराज उपस्थित होते.

नगरपंचायत निवडणुकीत विरोधी गटाकडून फक्त टीका करण्यात आले. पण शहराच्या सुज्ञ नागरिकांनी या टीकेला प्रत्युत्तर देत नगरविकास पॅनलला एक हाती सत्ता दिले. पाटील कुटुंबीय वर असलेले प्रेम आशीर्वाद यामुळे जनता आपणास एक हाती कौल दिले आहेत .मतदारांनी दिलेला कौल मुळे आपला आत्मविश्वास आणखी वाढला असून शहर वासियांचा विश्वास आपण सार्थ ठरणार आहोत. काँग्रेस काळात मंजूर झालेल्या कामांचा श्रेय विरोधकांनी लाटला. कुरघोडीचे षडयंत्र करून निवडणूक दरम्यान सत्ता काबीज करण्याचे स्वप्न पाहिले पण शहरवासीय व मतदार त्यांची जागा दाखविली आहेत .आपण यापुढे विकास कामांना जोर देणार असून शहराचा विकास कसा होईल याकडे प्रथम प्राधान्य देणार असल्याचे मत शेवटी उत्तम पाटील यांनी व्यक्त केले.

ज्येष्ठ नेते डॉ. शंकर माळी यांनी, भाजप व विरोध केंद्राकडून अनेक आमिषे दाखवण्यात आली पण या आमिषाला मतदार बळी न पडता उत्तम पाटील यांच्या नेतृत्वाला पसंती दिले आहेत .यामुळे भविष्यात बोरगाव शहराचा नाव विकास कामात राज्यात अग्रेसर होणार असून यापुढेही सर्वांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे सांगितले.

यावेळी समस्त आफराज गल्ली व मुस्लिम समाजाकडून युवा नेते उत्तम पाटील यांच्यासह नूतन सर्व नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास बाळु अफराज , जहांगीर अफराज,शकील अफराज, सलीम अफराज, शिवानंद राजमाने,मुसा अफराज, बाशु अफराज,हिंमत अफराज,अलिफ नदाफ, तुफान अफराज,विजय महाजन ,मुस्ताक कवाल, सोनु अफराज,जमीर माणगावे, किस्मत शेख , अकबर शेख,इरफान अफराज,राजू अफराज, बबलू शेख, नजीर नदाफ, चांदसाब, ताजुद्दीन ,सुलेमान, भैय्या, व सुरज अफराज यांच्यासह मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अजित कांबळे यांनी केले तर परवेज अफराज स्वागत केले तर सोनु अफराज यांनी सर्वांचे आभार मानले.


थोडे नवीन जरा जुने