Top News

6 जानेवारी रोजी बोरगांवात पत्रकार दिनी विविध कार्यक्रमाचे आयोजन.


अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

       सदलगा विभाग पत्रकार संघ, सदलगा यांच्या वतीने व कर्नाटक पत्रकार संघ बेळगाव यांच्या संयुक्त आश्रयाखाली गुरुवार ६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता बोरगांव येथे विविध उपक्रमाने आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृती दीना निमित्य पत्रकार दिन सोहळा साजरा होणार आहे. 

बोरगांव येथील राज किचन रेस्टोरंट च्या सभागृहात संघाचे अध्यक्ष शिवाजी भोरे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमा प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नगर पंचायतीचे मुख्याधिकारी पी ए कल्याण शेट्टी, सदलगा पोलीस स्टेशनचे उप निरीक्षक रवींद्र अज्जनवर, हेस्कॉमचे अधिकारी गंगाधर नाईक, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्याधिकारी डॉ. व्ही पी जोशी, तर प्रमुख वक्ते म्हणून एम टी देसाई हे उपस्थित राहणार आहेत. शिवाय या कार्यक्रमास निपाणी- चिकोडी तालुक्यातील जवळपास 30 हुन अधिक पत्रकार उपस्थित राहणार आहेत.

थोडे नवीन जरा जुने