राहुल डोंगरे / शिवार न्यूज नेटवर्क :
महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या सहकार्याने चिंचवाड ता. शिरोळ येथे कामगारांना सुरक्षा साहित्याचे वाटप करण्यात आले. पहिल्या टप्प्यात 21 बांधकाम कामगारांना सुरक्षा साहित्य वाटप करण्यात आले.
चिंचवाड येथे बांधकाम कामगारांना साहित्य वाटपप्रसगी शिरोळ नगरसेवक तातोबा पाटील म्हणाले, पालकमंत्री सतेज पाटील व दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली बांधकाम कामगारांचा परिपूर्ण विकास साधण्याचे आमचे ध्येय आहे. बांधकाम कामगारासाठी अनेक महत्वपूर्ण योजना असून कामगारांनी त्याची माहिती जाणून घ्यावी व नोंदणी करावी. बांधकाम कामगारांची सुरक्षितता महत्वाची असून काम करताना बांधकाम कामगारांनी सुरक्षा किट वापरून काम करण्याचे आवाहन यावेळी केले. बांधकाम कामगारांच्या नोंदणीसाठी व योजना प्रत्येकापर्यंत पोहचण्यासाठी सुशांत कांबळे चांगले नियोजन केले. यावेळी शंकर गोधडे, केशव कदम, बाळासो कदम, अर्चना चौगुले, दत्तात्रय माने यांच्यासह महिला, बांधकाम कामगार उपस्थित होते.