Top News

पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्यात बालक गंभीर जखमी ; हेरवाड येथील प्रकार


 हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

हेरवाड येथील माळभाग परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्यात बालक जखमी झाल्याची घटना घडली आहे. विराज माळगे (अंदाजे वय : 3) असे जखमी झालेल्या बालकाचे नांव असून पिसाळलेल्या कुत्र्याने बालकाच्या तोंडाचा व कपाळाचा चावा घेतल्याने सदरच्या बालकाला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलविण्यात आल्याचे समजते.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, हेरवाड येथील माळभागात असणार्‍या कुमार विद्या मंदिर शाळा परिसरात माळगे कुटूंब वास्तव्यास आहे. आज सकाळी 9 वाजता विराज हा आपल्या अंगणात खेळत होता. यावेळी अचानक पिसाळलेल्या कुत्र्याने विराज याच्यावर हल्ला केला. यावेळी कुत्र्याने विराज याच्या तोंडाचा व कपाळाचा चावा घेतला, यावेळी झालेल्या आरड्याओरड्या मुळे कुत्र्याने तेथून पळ काढल्याने आरव याचा जीव वाचला.विराज याला तातडीने गावातील खासगी रुग्णालयात दाखविण्यात आले मात्र, कुत्र्याच्या हल्यात सदरच्या बालकाला गंभीर दुखापत झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान, माळगे यांची परिस्थिती हालाकीची असल्यामुळे विराज याच्या दवाखान्यासाठी येथील आर.बी. पाटील यांनी आर्थिक सहाय्य करून सामाजिक बांधिलकी जोपासली.

थोडे नवीन जरा जुने